Ticker

6/recent/ticker-posts

पंकज देशमुख मृत्युप्रकरणी न्याय देण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकवटले





शेगांव- - जळगांव (जामोद )येथील भाजप कार्यकर्ता स्व. पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाची सी. आय. डी. चौकशी व्हावी याबाबत शेगांव शहर परिसरातील सर्वपक्षीय तसेच सर्वधर्मीय बांधवांच्या वतीने तहसिलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. संजय देशमुख मृत्यु प्रकरण हे संशयाच्या भवऱ्यात असल्याचे बोलल्या जात असल्याने या घटनेबाबत प्रशासनाने जागरुकता बाळगावी असे निवेदनकर्त्यांचे मत आहे. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, बुलढाणा येथील कट्टर भाजप कार्यकर्ता स्व. पंकज उत्तमराव देशमुख ह्यांची 3मे 2025ला त्यांच्याय शेतात छोट्याश्या झाडाला लटकविलेली मूर्त शरीर दिसले. त्या मृत शरीराचे पाय जमिनीवर टेकलेले होते.

त्यांच्या शरीरावर अनेक जखमा दिसल्या. कानामागून रक्तस्‍त्राव होत होता. हाताची बोटे मोडलेली दिसत होती. हातावर अग्नी मुळे चटका लागलेला दिसत होता.

तसेच त्यांचे तळपायाची जखम रक्ताने भरलेली दिसली. पोस्टमॉर्डम जळगांव जामोद येथील उपजिल्हा रुगणल्यात न करता परिवाराला विश्वासात न घेता अकोला इथे हलविले. तसेच जळगांव ते अकोला दोन तासाचा प्रवास पाच तासात पूर्ण केला. अशा अनेक शंका या प्रकरणात उद्‌भवत आहेत. त्यांच्या धर्मपत्नी सुनीता देशमुख ह्यांनी सुद्धा सी आय डी तपासणीची मागणी लावून धरली आहे.

तरी आमच्या त्यांच्या मागणीला पाठिंबा असून पंकज देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी न झाल्यास जनता उग्र जन आंदोलन करेल.तरी आमच्या निवेदनची जन भावना लक्षात घेऊन न्याय द्यावा.

असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर कैलास देशमुख काँग्रेस शहराध्यक्ष, शैलेंद्र पाटील, योगेश पल्हाडे, ॲड शैलेष पटोकार, संजय पहुरकर, प्रा.भुषण दाभाडे, मोहम्मद सलमान, संदेशकुमार शेगोकार, सखाराम वानखडे, अनिल सावळे, श्रीधर पाटील, दिनेश लहाने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या