Ticker

6/recent/ticker-posts

दात दुखीसाठी घरगुती उपाय ठरू शकतात फलदायी!

 



आजच्या  धकाधकीच्या जगामध्ये वावरतांना मानवी आरोग्य हा महत्वाचा मुद्दा असला तरी आपले दैनंदिन कामामुळे वैयक्तिक पातळीवर अक्षम्य दुर्लक्ष होत असते. आणि आहार हा मानवी जिवनाचा घटक असून ते सेवन करण्याकरीता दातांची निगा हा अत्यंत महत्वपुर्ण भाग आहे. परंतु त्याकडे कानाडोळा न होता. वैद्यकीय तज्ञांकडे जावून उपचार करण्याकरीता हे घरगुती उपचार दातासाठी फायद्याचे ठरु शकतात. तरी आपल्या या घरगुती वापरातील वस्तुपासून आपण दाताचे केलेले उपचार हे फलदायी ठरु शकतात.

दातदुखीचा त्रास कधीकधी असह्य होतो. दातदुखीच्या वेदना आणि त्रास कमी करण्यासाठी घरातच उपलब्ध असलेल्या काही गोष्टींचा उपयोग केला जाऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास सहजरीत्या उपलब्ध होणाऱ्या गोष्टींची माहिती देत आहोत, ज्यामुळे दातदुखीचा त्रास होणार नाही.


कापूर

वेदनेच्या ठिकाणी कापूर ठेवल्यास आराम मिळेल. लाळ गिळू नका.

कांदा

यामध्ये अँटीबॅक्टीरिअल क्वालिटी असते. कांद्याचा तुकडा दात दुखत असलेल्या ठिकाणी ठेवा.

लसुण

यामध्ये अँटीबॅक्टीरिअल क्वालिटी असते. लसणाची पाकळी बारीक करून त्यामध्ये मीठ टाकून हे मिश्रण दात दुखणाऱ्या ठिकाणी लावा.

मीठ

एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून, या पाण्याने थोडावेळ गुळणा करा. दातदुखीचा त्रास कमी होईल.

पेरूच्या झाडाची पाने

कीड लागल्यामुळे वेदना होत असल्यास पेरूच्या झाडाची ४-५ पाने पाण्यामध्ये उकळून, या पाण्याने गुळणा करा. पान चावल्यासही आराम मिळेल.

अद्रक

याच्या अँटीबॅक्टीरिअल आणि अँटीइन्फ्लेमेटरी गुणामुळे वेदना आणि सूज कमी होते. अद्रकाची पेस्ट लावावी किंवा अद्रक चघळावे.

बर्फ

वेदनेच्या ठिकाणी बर्फ ठेवल्याने ब्लड सर्क्युलेशन कमी होते आणि वेदनेचे जाणीव होत नाही.

तुरटी

तुरटीची पावडर वेदना असलेल्या ठिकाण ठेवा. लाळ बाहेर थुकत राहा. तुरटीच्या पाण्याने गुळणा केल्यासही आराम मिळेल.

लवंग

यामध्ये युजेनॉल असते, जे वेदनेपासून आराम देते. वेदनेच्या ठिकाणी लवंगाचे तेल लावावे किंवा लवंग दातांमध्ये दाबून ठेवावी.

हिंग

दात दुखत असलेल्या ठिकाणी हिंग लावावे. लाळ थुकत राहावी. थोड्याच वेळात दातदुखी नष्ट होईल.

मोहरीचे तेल

३-४ थेंब मोहरीच्या तेलात चिमुटभर मीठ टाकून दात आणि हिरड्यांची मसाज केल्यास वेदना कमी होतील.

दालचिनी

यामध्ये नैसर्गिक पेनकिलर युजेनॉल असते. दालचिनी पावडर वेदनेच्या ठिकाणी लावून ठेवा आणि थोड्यावेळाने थुकुन टाका.

तेजपत्ता

हे एक नैसर्गिक पेनकिलर आहे. तेजपत्ता बारीक करून त्यामध्ये मीठ मिसळून हे मिश्रण वेदनेच्या ठिकाणी लावा. थोड्यावेळाने थुकुन टाका.

कडूनिंब

कडूनिंबाच्या काडीने दात घासावेत. कडूनिंबाचे ४-५ पाने चघळल्याने दाताच्या वेदना कमी होतील. कडूनिंबाचे तेल वेदनेच्या ठिकाणी लावल्यास आराम मिळेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या